विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज एखतपुरमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

प्रारंभी निवृत्ती सेवा संघाचे अध्यक्ष कृषी भूषण प्रभाकर काका चांदणे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले .ध्वजारोहणानंतर देशभक्तीपर गीत सादर करण्यात आली, याच वेळेस पाचवी ते नववी मधील विद्यार्थिनींनी विविध देशभक्तीपर गीता वरती सुंदर नृत्य सादर केले .सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या शुभहस्ते यावेळी करण्यात आले .अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य महेश आली गावे
, कै .अण्णासाहेब चांदणे कृषी तंत्रनिकेतन चे प्राचार्य कौलगे सर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना माननीय प्रभाकर चांदणे यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला कष्टाशिवाय पर्याय नाही, कष्ट करेल तोच सुखी होईल असे विचार व्यक्त केले .याप्रसंगी सचिन ज्वेलर्स यांच्या वतीने उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना बिस्किटे वाटण्यात आली या कार्यक्रमाला शिक्षक पालक सभेचे उपाध्यक्ष सिताराम इंगोले त्याचबरोबर संतोष शिलेदार, येनुरकर वहिनी, शिलेदार वहिनी या कार्यक्रमाला उपस्थित होते .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख जितेश कोळी सर यांनी केले