लक्ष्मीदेवी विद्यामंदिर,सोनंदमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा…..

सोनंद- (प्रतिनिधी) स्वतंत्र भारताचा प्रजासत्ताक दिन दि. २६ जानेवारी लक्ष्मीदेवी विद्यामंदिरमध्ये मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. भारतीय सेनादलात सेवा करुन निवृत्त झालेले,सुभेदार मेजर मुरलीधर गोविंद ठोकळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी सुभेदार मेजर रामचंद्र मारुती काशीद , सुभेदार मेजर बबन दादा काशीद ,हवालदार लालासो विठोबा कोडग , सुभेदार मेजर गजानन श्रीकृष्ण कुलकर्णी,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.जगन्नाथदादा काशीद ,संस्था सदस्या सौ.रजनी भोसले कॉलेजचे प्राचार्य हेमंत आदलिंगे, मुख्याध्यापिका सौ.पुष्पा महाकाळ,पर्यवेक्षक सुभाष आसबे पर्यवेक्षिका सौ.सुषमा ढेबे ,सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी वर्ग विद्यार्थी आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनानिमित्त लक्ष्मीदेवी शिक्षण संकुलात विद्यार्थ्यांनी अतिशय नाविण्यपूर्ण देशभक्ती जागृत व्हावी.यासंदर्भात भाषणे केली.
भाषणे ऐकून सेवानिवृत्त जवानांनी चिमुकल्या बालकांचे मनःपूर्वक कौतुक केले. प्रास्ताविक प्राचार्य हेमंत आदलिंगे यांनी केले. प्रा. सुभाष आसबे सरांनी शिक्षक मनोगत व्यक्त केले.
रांगोळी स्पर्धा,तसेच २०२४-२५ वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट,उल्लेखनीय कामगिरी बजावणार्या,आकर्षक भूमिका साकारलेल्या विद्यार्थ्यांनाही बक्षीस प्रदान करण्यात आली. स्नेहसंमेलनामध्ये सहभागी झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देवून त्यांना प्रोत्साहित करण्यात आले.
ध्वजारोहण समारंभाचे प्रमुख अतिथी सुभेदार मेजर मुरलीधर ठोकळे यांनी सुद्धा आपल्या भाषणातून परिचित- अपरिचित ऐतिहासिक नेत्यांनी वेगवेगळे उठाव करून ,घोषणा देऊन ,प्राणांची आहुती देऊन भारताला स्वातंत्र्य कसे प्राप्त करून दिले. इसवी सनासहित ऐतिहासिक घटना विद्यार्थ्यांना सांगितल्या .एक आदर्श नागरिक कसे बनता येईल. त्याशिवाय भारतीय संविधान व त्यातील नागरिकांची कर्तव्ये व अधिकार याचे महत्त्वही पटवून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षिका सौ. सुषमा ढेबे,सहशिक्षक श्री. अमोल केंगार यांनी केले ,क्रीडाशिक्षक राज माळी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेतील विद्यार्थ्यांनी राष् ट्र ध्वजाला सलामी देत बँड पथकाच्या सहाय्याने उत्कृष्ट संचलन देखील केले.आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका सौ. पुष्पा महांकाळ यांनी केले.खाऊ वाटपाने प्रजासत्ताक दिन समारंभाची सांगता झाली.
विद्यार्थ्यांना खाऊ वाटप संस्थेकडून तसेच सोनंद गावातील प्रसिद्ध व्यापारी श्री.
निलकंठ पाटणे यांनी वैयक्तिक विद्यार्थ्यांना पौष्टिक अशी शेंगदाण्याची चिक्की दिली.
लक्ष्मीदेवी शिक्षण संकुलात सेवानिवृत्त जवानांच्या हस्ते ध्वजवंदन केल्यामुळे जवानांनी कृतज्ञता व्यक्त करत इ.१०,१२ वी,तसेच इतर स्पर्धेतील विद्यार्थ्यांना जुलै महिन्यात बक्षिसे देवून गौरविण्याचे आश्वासन दिले.
प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम उत्साहात होण्यासाठी सर्व सेवक, सेविका यांनी उत्तम काम केले.